बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

                                     
आनंदाची बातमी 

महाराष्ट्र साहित्य शिक्षण संस्था द्वारा
शिक्षण सेवा प्रतिष्ठान राजुरा
यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०१६ हा पुरस्कार मला जाहीर झालाय
काय कमाल आहे बुवा ईश्वराची ............. 
जगणे म्हणजे काय ???????? ..... आनंद देणे आणि घेणे ....... याव्यतिरिक्त काय असेल बर .......
लहान लहान मुलामध्ये शिक्षण रुपी आनंद देऊन मजा घेतो मी .........बाकी काहीही नाही .....या आनंदाला जोड नाही....... अन पर्याय देखील नाही
मी सतत बालके घडविण्याचा प्रयत्न करतोय तर ते देखील मला घडवतात !!!!!!!! ...... ही सफर न संपणारी आहे ....... जशी तुमची मैत्री ..... व प्रेम .........
धन्यवाद अर्थात " DW" ( हे देखील मित्रांनीच शिकवलंय बर का ? )
शिक्षण सेवा प्रतिष्ठान राजुरा व आप्नावारखे जिवलग मित्र
या पुरस्कारापेखा आपल्या सद्भावना व प्रेम अधिक आवडते मला ......
ते राहू द्या ..............
आपला
मुकुंद पवार हिंगोली

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६


आमच्या जि प प्रा शा हाताळा शाळेतील विद्याथिनीने केलेली सुन्दर रचना
खर पाहिलं तर कल्पनेला अंत नसतो लहान लहान चिमुकले काय करतील याची कल्पना न केलेलीच बरी 
शाळेत गेलो तेव्हा दररोज प्रमाणे आज काहीतरी नवीन होणार असे वाटत होते दुपारच्या मध्यांतर झाले तेव्हा काही विद्यार्थी मला काहीतरी दाखवण्यासाठी , काहीतरी सांगण्यासाठी आतूर झाले होते पण सांगायला लाजत होते मग लक्ष्मण जवळ आला व मला म्हणाला सर हे पहा आम्ही काय शिकलो आहोत त्याने इतराना सुचवले लगेच भराभर संजीवनी सरस्वती प्रतिभा व इतर विद्यार्थ्यांनी चित्रे ( कलाकृती ) दाखविण्यास सुरुवात केली
 
अबब काय त्यांची अजोड कलाकृती.................. एखाद्या नामवंत कलाकाराला लाजवेल अशी होती ......... त्यांचा दाखविण्याचा उत्साह थक्क करणारा होता...... त्यांचा आनंद .......... अप्रतिम .......
साहित्य आणण्याचा ........... जुळवाजुळव करण्याची ......... मेहनत करण्याची ......... वेळ देण्याची .... कसलीच तक्रार नव्हती ................ कार्य करता करता आनंद देत व घेत या कलाकारांनी आम्हाला हि मेजवानी दिली होती
thanks बाल कालाकारानो

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

           सोमनाथ दा hats off to you 
आज जिल्हा परिषद हिंगोली व महाराष्ट्र राज्य प्रा शि संघ यांनी आयोजित केलेले कार्याप्रेरणा शिबीर उत्साहात संपन्न झाले 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जयश्री आठवले प्राचार्या डायट हिंगोली यांनी हिंगोली जिल्ह्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची वाटचाल विषद केली तदनंतर श्री दिपक चवणे शिक्षणाधिकारी हिंगोली यांनी मार्गदर्शक उद्बोधक मार्गदर्शन केले श्री थोरात सर अध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ यांनी आपली शिक्षक संघटना हि नेहमी शिक्षण व शिक्षकांचे प्रश्नसोडविण्यासाठी कसे प्रयत्न करते हे उलगडून दिले 
या सर्व औपचारीक्ते नंतर ज्याची सर्वांनी ओढ लागली होती त्या श्री सोमनाथ वाळके सर यांचे अमूल्य मार्गदर्शन झाले त्यांच्या मार्गदर्शन मधील ठळक मुद्दे 
१.शिकणे म्हणजे न करता येणारी गोष्ट चांगल्या प्रकारे करता येणे
२.वर्तनवाद व ज्ञानराचानावाद यातील फरक समजावून दिला
३.प्रत्येक मुलाला समजून घेणे खूप आवश्यक
४.प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी आपला विशिष्ट वेळ द्यायला हवा.
५.मुलांच्या प्रतिभेचा सन्मान करा ते तसे घडतात
६.मुलाना ज्ञाननिर्मिती साठी प्रेरणा देणे आवश्यक
७.त्यासाठी अनुभवांची मांडणी आपण शिक्षकांनी करावी
८.मुलाना प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सहाय्य करावे
९.मुलाना निर्णय घेण्याची जबाबदारी उचलू द्यावी
१०.मुलाना त्यांच्या मनाप्रमाणे आनंद घेऊ द्यावे .

वरील बाबी समजाऊन देण्यासाठी सोमनाथ दा ने अक्षरशः अनेक कथा प्रसंग काही त्यांच्या जीवनातील तर काही समोर पाहिलेले सांगितले 
सोमनाथ ने जेव्हा स्वतःची चित्रकला शिक्षकाची कथा सांगितली तेव्हा त्याच्या तसेच उपस्थिताच्या डोळ्यात अश्रू तरळून गेले 
त्याच्या ' चिंचाळा ते सिडने " हि सत्यकथा ऐकून एक अशिक्षित घरातील मुलाला सलाम केल्यावाचून करमत नाही अंगावर रोमांच उभे राहतातच 
त्याने त्याच्या शाळेवर केलेल्या उपक्रमांची माहिती देताना राहून राहून डोक्यात विचार येत होता कि एवढी उर्जा हा आणतो कोठून? ? 
मुलांसाठी तयार केलेला studio त्यासाठी घेतलेली मेहनत खरेच अद्वितीय 
ज्ञानरचनावाद हा साहित्यात नसून तो मेंदूत आहे हे वाक्याने डोळ्यात झणझणीत अंजनच घातले 
त्याचा संवाद संपूच नये असे वाटत असताना त्याने आवरते घेत ""मह्या गुरुजीची गाडी " हि कथा सांगून समारोप घेतला खर सांगू मित्रा त्यावेळी सर्व सभाग्रह डोळ्यात पाणी आणून ऐकतच राहिले
सोमनाथ Really hats off to you मित्रा 
मुकुंद पवार 

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

                                    शाळा भेट गांधीनगर 
                    शनिवारी जि प प्रा शा गांधीनगर शालेला भेटण्याचा योग आला .मी व सहकारी श्री इढोले सर तेथे गेल्यावर आमचे डोळे शाला पाहून दिपून गेले .व मला त्या शालेचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. 
                      शालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.एस भोने ,सहकारी श्रीमती अंजली कोठिकर ,श्री रमेश कावरखे,श्री.जयकुमार वानखेड़े यांनी मिळून शालेचा कायापालट केलेला दिसून आला.
                     प्रा .शा.गांधीनगर टीम च्या कार्याला माझा मानाचा मुजरा 
(आपनासाठी काही फोटो टाकत आहे )













गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

   मा डॉ पुरुषोत्तम भापकर, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य 
  यांचा नांदेड ,हिंगोली व परभणी जिल्हा दौरा व या दरम्यान शिक्षण परिषदेचे आयोजन 
राज्यातील ज्ञान रचना वादी कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी ,क्रियाशील असणार्या शिक्षकाना अधिक क्रियाशील करण्यासाठी मा डॉ पुरुषोत्तम भापकर आयुक्त  यानी दत्तक घेतलेल्या जिल्हयामधे मा आयुक्त साहेबांच्या उपस्थितीत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
शिक्षण परिषदेचे नियोजन
दि .४ फेब्रुवारी २०१६ नांदेड
दि ५ फेब्रुवारी २०१६ हिंगोली
दि ६ फेब्रुवारी २०१६ परभणी
                    या प्रत्यक शिक्षण परिषदेत सुमारे १००० शिक्षक पर्यवेक्षक अधिकारी समाविष्ट होतील .यामधे मा आयुक्त शिक्षण यानी दत्तक घेतलेल्या तालुक्यातील ,बिट मधील सर्व शिक्षक पर्यवेक्षक अधिकारी उपस्थित राहतील
                   याचबरोबर जिल्ह्यात अतिशय चांगले काम करणार्य शिक्षक,मुख्याध्यापक ,केन्द्रप्रमुख, विस्तार अधिकारी ,ग शि अ ,डायट अधिकारी  याना शिक्षण परिषदेमधे आपल्या कार्याचे सादरीकरण करण्याची संधि मिळणार आहे .
                  काही दत्तक शालाना साहेब स्वतः भेटी देणार आहेत .
                  याचा परिणाम म्हणजे या जिल्हयामधे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक वातावरनाची आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविनारच या मानसिकतेची निर्मिती होणार आहे.
               गुणवत्ता ,गुणवत्ता ,ध्यास आमचा गुणवत्ता 

                 जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शना मधील काही क्षणचित्रे
                    ठिकान   के विट्ठल राव घुगे विद्यालय हिंगोली 
                              दि २७/०१/२०१६  ते २९/०१/२०१६ 
प्रथम क्रमांक